डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करून माधवी ताई जोशींनी केली प्रचाराला सुरुवात
मावळ (4K News)नुकतेच देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण चालू आहे तशातच ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी ताई जोशी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आपल्या प्रचार करायला सुरुवात केली.आपली निशाणी ऑटो रिक्षा असल्याने माधवी ताई जशी यांनी रिक्षातून प्रवास करून मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आणि मतदानाचे आवाहन केले .
३३ मावळ लोकसभा मतदार संघात महिला आरोग्य ,आदिवासी वंचित घटकासाठी काम करणार असून संपूर्ण मतदार संघात विकास कामे मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी आपल्याला निवडून द्यावे असे आव्हान माधवी जोशी यांनी केले आहे.


३३ मावळ लोकसभा मतदार संघात दोन बलाढ्य उमदेवार असले तरी वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात या मतदार संघात असून बाळासाहेब आंबेकर माझ्या पाठीशी आहेत म्हणून माझा विजय नक्कीच होईल असे यावेळी माधवी ताई जोशी यांनी सांगितले .


थोडे नवीन जरा जुने