संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची खारघर कामोठे मध्ये दुचाकी रॅली ...






पनवेल : दि. ०७ (4K News) ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील , यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर आणि कामोठे विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दुचाकी रॅली च्या माध्यमातून रोड शो करणार आहेत. ९ मे रोजी ३०० दुचाकी आणि चार चाकी वाहने या रोड मध्ये सहभागी होणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 



  मंगळवार दिनांक ७ मे रोजी खारघर येथील शिवसेना कार्यालयामध्ये आदित्य ठाकरे यांच्या रोड शो बद्दल माहिती देण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.खारघर मधून वाहनांच्या रॅलीला प्रारंभ होईल. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की वाहतुकीला कुठलाही अडथळा न होता महाविकास आघाडीची मोटर सायकल रॅली निघणार आहे. खारघर मध्ये फिरल्यानंतर ही रॅली कामोठ्यामध्ये येईल. कामोठ्यामध्ये रॅलीची सांगता होईल यावेळी आदित्य ठाकरे साहेब मतदारांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्या अशा स्वरूपाचे आवाहन करतील तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आगामी काळातील प्रचाराच्या यंत्रणेबद्दल मार्गदर्शन करतील.


 यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना  खारघर वासियांची मानसिकता बदलली आसल्याचे माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले. ते म्हणाले की कधी मोदी साहेबांच्या लाटेवर तर कधी अर्थकारणाच्या जोरावर खारघर वासीयांची दिशाभूल केली गेली आहे. परंतु खारघर वासीयांनी यांना मते दिल्याचा आता त्यांना पश्चाताप होत आहे.

माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेस चे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक, पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख वैभव सावंत, खारघर फोरम च्या लीनाताई गरड, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा अनुसूचित जाती जमाती च्या महिला आघाडी अध्यक्ष मायाताई अहिरे,ज्येष्ठ काँग्रेस नेते जी आर पाटील, युवा सेनेचे अवचित राऊत, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी, मधू पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने