पारंपारिक मतदारांची नावे यादीतून वगळल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक


पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघातील मागील मतदार यादीतील एकूण मतदानापैकी मतदान यादीतून 44 ते 45 हजार नावे वगळण्यात आली आहेत. ही नावे का वगळण्यात आली ?? याला जबाबदार कोण ?? मावळ लोकसभा निवडणुकीत पनवेल क्षेत्रातील हे पारंपारिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्यामुळे मतदारांना मतदाना पासून वंचित राहावे लागले. याला प्रशासन जबाबदार आहे. सदर कृतीमुळे मतदानाचा हक्क घटला असून, याबाबत मतदारांनी तीव्र शब्दात नाराजी दर्शवली आहे. सदर बाब ही नावे का वगळण्यात आली??
 कारण अद्याप समोर आले नाही याचा खुलासा करण्यात यावा अन्यथा या संदर्भात येणार्या अधिवेशनात विधानसभेमध्ये तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात येईल. काही लोकांची मतदार यादीत नावे होती परंतु त्यांच्या ठिकाणी दुसर्याचा फोटो असल्याने त्यांच्या ठिकाणी बोगस मतदान करण्यास प्रशासनाने वाव दिला, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आज तहसीलदार विजय पाटील यांची भेट घेवून प्रशासनावर केला व याबाबतचे निवेदन सुद्धा देण्यात आले.
या सर्व तक्रारीची तत्कळ दखल घेऊन वगळण्यात आलेली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावी अश्या प्रकारचे निवेदन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या माध्यमातून तहसिलदार विजय पाटील  यांच्या कडे देण्यात आले. यावेळी महानगर समन्वयक दीपक घरत, शहर प्रमुख रामदास गोवारी, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर संघटक संतोष गोळे, उपशहर प्रमुख हरेष पाटील, उपशहर प्रमुख गणेश खांडगे, ग्रामीण विभाग प्रमुख शशी भगत, युवासेना महानगर अधिकारी महेश भिसे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने