शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पनवेल, दि.1 (संजय कदम) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसेना भगवा सप्ताह आयोजित शिवसेना नवीन पनवेल शहराच्या वतीने संत साईबाबा शाळा नवीन पनवेल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहर प्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वा मध्ये करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते,
 तालुका प्रमुख श्री. विश्‍वास पेटकर, संदिप तांडेल, उपमहानगर प्रमुख किरण तावदरे, शहरप्रमुख यतीन देशमुख, उपशहर प्रमुख ज्ञानेश्‍वर भंडारी, विभाग प्रमुख किरण सोनवणे, बिपिन झुरे, विभाग प्रमुख प्रमोद पाटील, विक्रांत पाटील,उपविभाग प्रमुख धनंजय पाटील,जीवन पाटील, महिला आघाडीच्या सौ. तनुजा झुरे, सौ. मालती पिंगळा, सौ. वैशाली थळी ,नम्रता शिंदे , उपविभाग विकास पोवळे, राजेश वैंगणकर, शाखा प्रमुख गोविंद जोग, मृण्मय काणे, खंडागळे, सत्यवान गायकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने