रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती एस. के. नाईक यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात अली असून सदरचे नियुक्तीपत्र त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विस्तारित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड.प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल