नवीन पनवेल गाडी मागे घेत असताना चाकाचा धक्का लागल्याने ४६ वर्षीय शकील हबीब अहमद यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चारचाकी चालकाने गाडी मागे घेत असताना वाहनाच्या चाकाचा धक्का शकील हबीब अहमद यांना लागला. यात त्यांना हाताला आणि शरीराला गंभीर दुखापती झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
Tags
पनवेल