भाजप नेते निलेश राणे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते 23 ऑक्टोबर रोजी भाजप सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत
. भाजपने 99 जागांवर उमेदवार देखील जाहीर केले आहेत. निलेश राणेंचे भाऊ नितेश राणेंना कणकवलीतून भाजपने तिकीट दिलंय. त्यामुळे निलेश राणे शिंदे गटात गेल्यास कुठून लढणार? याकडे लक्ष लागले आहे.
Tags
मुंबई