आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार-सुरेश फडकेपनवेल प्रतिनिधी


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार लोकसभेला श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने प्रचार केला होता त्याच प्रमाणे पनवेल चे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभेत चौथ्यांदा पाठवण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराचे काम करेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पनवेल विधानसभा अध्यक्ष सुरेश फडके यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी च्या वतीने प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विधानसभा प्रचार च्या नियोजन, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुकापूर येथे आयोजित केली होती.

या बैठकीत आपले पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रचार कामाला लागावे असा सर्वानुमते निर्णय झाला. या बैठकीच्या समारोपात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थिती लावुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे 

सबका साथ सबका विकास प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती ताई तटकरे  या लाडकी बहीण योजना अतिशय प्रभावी पणे राबवत आहेत. सर्वांनी विधानसभा
 निवडणुकीत एकदिलाने काम करावे आपला आमदार म्हणुन निश्चितच आपल्याला जे जे सहकार्य लागेल ते ते करण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी उपस्थितांना दिले या वेळी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पनवेल कार्याध्यक्ष चंद्रशेखर जळे, राजकुमार पाटील , पनवेल विधानसभा सचिव रवी म्हात्रे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष एस डी हवालदार पनवेल महानगरपालिका जिल्हा युवा अध्यक्ष मंगेश नेरूळकर रोशन आंग्रे किशोर पुरोहित अर्जुन गवळी रेखा दांडेकर किशोर मुंडे स्नेहल गुरव नंदा काथारा,स्नेहल गुरव, किरण अडाग्रे आदी मान्यवर उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने