विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज; सर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग

जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल विधानसभा प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी नगरसेवक हरेश केणी,शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, परेश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, सुनील घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भीमसेन माळी, शिवदास कांबळे, सुरेश फडके, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, आरपीआयचे नेते प्रभाकर कांबळे, मोहन गायकवाड, भाजप खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 
               मागील तीनही विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारली असून यावेळीही प्रचंड मताधिक्याने विजय मिळेल अशी खात्री पनवेल मतदार संघातील मतदार नागरिक देत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात केलेल्या कामांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आहे
. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा आणि दांडगा जनसंपर्क असलेले सर्वसामाजाचे प्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. सर्वांगिण आणि शाश्वत विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने मोठे योगदान देत आहेत. 
त्यामुळे त्यांना सर्व समाजात मानणारा वर्ग मोठा आहे. यावेळीही मोठा विजय असावा अशी संपूर्ण मतदार संघातील जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्व समाजातील नागरिक सज्ज झाल्याचे स्पष्ट चित्र आज अर्ज दाखल करताना दिसत होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर कविता चौतमोल, 

माजी नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, बबन मुकादम, चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांचीही भाषणे झाली. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी सर्वानी सज्ज राहू या, असे आवाहन केले. 

थोडे नवीन जरा जुने