खारघर (4KNews )रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरात यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर खारघर येथे निर्धार मेळावा पार पडला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पनवेल विधानसभा मतदार संघातील येणार्या विधानसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड श्री. शिरीष घरात यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांचा निर्धार मेळावा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पार पडला.
यावेळी पनवेल मतदार संघात पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याला मान्यता देऊन विधानसभे च्या निवडनुकीचे काम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्व पदाधिकारी व शिवसैनीकांना दिली. तसेच पनवेल मधील सर्व पदाधिकारी यांनी आपली मते मांडली.
यावेळी जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर संघटक डीएन मिश्रा, शशिकांत डोंगरे, युवासेना सहसचिव अवचित राऊत, जिल्हाधिकारी पराग मोहिते, केवळ माळी, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सौ. सुजाता कदम, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर यांच्यासह सर्व उपतालूका प्रमुख, सर्व शहर प्रमुख, सर्व शहर संघटक, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धन्यवाद.
संपादकं : गौरव जहागीरदार
9967447111
Tags
खारघर