पनवेल (4kNews)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. देशाचा विकास त्यांना नेहमीच खूपत आला आहे. समाजांमध्ये फूट टाकणे आणि सत्ता काबीज करणे हेच त्यांचे आजवरचं धोरण राहिले आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील समाजांना फोडण्याचा षडयंत्र काँग्रेसने रचलं आहे.
परंतु, आम्ही त्यांना यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही”.काँग्रेसचे नेते परदेशांमध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्ष महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत. जेणेकरून त्या छोट्या जातींची, समुदायांची राजकीय शक्ती कमी व्हावी आणि ठराविक लोकांनाच सत्तेचा मलिदा मिळावा.काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाऐवजी फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती राहिली आहे”.
Tags
पनवेल