पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : आदर्श भारत माझा दीपावली विशेषअंक चे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवास्थानी अनेक पत्रकार बंधूंच्या उपस्थित करण्यात आले.
या वेळी आदर्श भारत माझा चे संपादक आण्णासाहेब आहेर हे छत्रपती राजश्री शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानत कार्य करत असल्याचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आनंद व्यक्त करत
दिवाळी अंकाचे कौतुक रामशेठ ठाकूर यांनी आदर्श भारत माझा च्या दिपावली विशेषांकाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख मान्यवर ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे, जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर, पत्रकार गणपत वारगडा, पत्रकार भालचंद जुमलेदार, पत्रकार सुनील वारगडा,पत्रकार शंकर वायदंडे,पत्रकार शेखर भोपी,पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार राम बोरिले, प्रदीप वायदंडे, साहिल रेळेकर आदी मंडळी उपस्थित होते.
Tags
पनवेल