कामोठे मध्ये घुमतोय शिट्टीचाच आवाज


विधान सभेची निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. ऑक्टोंबर हिट ऐवजी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण गरम होत आहे. पनवेल मध्ये तिरंगी लढत होत असून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना मिळालेली निशाणी शिट्टीने कामोठे मध्ये सर्वत्र जोर धरला आहे.
आता बदल हवा पनवेलचा आमदार नवा ही टॅग लाईन जोरदार चालत आहे. उमेदवार बाळाराम पाटील यांनी कमोठ्यातील प्रत्येक सेक्टर मध्ये दौरे केले असून त्यांच्या चौक सभेला देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
एकंदरीत शेकाप आणि महाविकास आघाडीने कामोठे मध्ये प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे, काँग्रेस नेते सुदाम पाटील, आर. सी. घरत, राष्ट्रवादी (श. प.) सतीश पाटील आदी नेते पूर्ण ताकद लावत आहेत.
यात प्रामुख्याने मा. नगरसेवक प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, सखाराम पाटील, अल्पेश माने, गौरव पोरवाल, सुरेश खरात ,कुणाल भेंडे, सचिन भेंडे, सचिन झनझणे, काँग्रेसचे जयेश लोखंडे, सूरज नेरुटकर, राष्ट्रवादी शरद पवार गट सूरदास गोवारी, चंद्रकांत नवले, महेंद्र पाटील, दत्तात्रय औटी आपचे शरद पडूळकर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत.
जेव्हा कामोठे वसाहत निर्माण झाली ते आता पर्यंत शेतकरी कामगार पक्षाने कामोठे मध्ये अनेक लोकपयोगी कामे केली त्यात प्रामुख्याने 12.5% मध्ये कच्चे रस्ते, प्रत्येक सेक्टर मध्ये स्टँड पोस्टने पाणी असे सिडकोने नमूद केले होते मात्र शेकापनेच आंदोलन करून पक्के रस्ते आणि आज जे घरात नळाला पाणी आणले. कामोठे मध्ये आरोग्य केंद्र, मानसरोवर रेल्वे स्टेशन लवकर सुरू व्हावे म्हणून आंदोलन केले होते. कामोठे प्रवेश द्वारावर उड्डाण पूल, वाशीला जाणार लिफ्ट सुरू व्हावा यासाठी सक्रिय सहभाग, सेक्टर 36 मध्ये स्वखर्चाने गार्डन उभारले अशी अनेक विकासाची कामे केली असून कामोठेकर याची दखल घेऊन सुसंस्कृत आणि मनमिळावू उमेदवार बाळाराम पाटील यांना नक्कीच लीड मिळवून देतील, अशी अपेक्षा शकाप कामोठे शहर अध्यक्ष अमोल मुकूंद शितोळे यांनी व्यक्त केली.
थोडे नवीन जरा जुने