आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या प्रचारासाठी गोव्याचे आमदार व गोवा सरचिटणीस श्री दयानंद सोप्टे व संघाचे प्रचारक माधव गांगुर्डे यांनी बैठका लावण्यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्यावर जबाबदारी सोपवलेली होती . त्या अनुषंगाने आज कळंबोली संपर्क कार्यालयामध्ये उत्तर भारतीय समाज तसेच दक्षिण भारतीय समाज केरला , समाज , तेलगू कन्नडा समाज , मुथुपन्न सेवा समिती समाज इत्यादी समाज घटकांबरोबर बैठका पार पडल्या
. सर्वांशी प्रत्यक्ष चर्चा करून जास्तीत जास्त मतदान कसे वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली . सर्व समाजातील मान्यवरांनी आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले . या बैठकीसाठी उत्तर भारतीय समाजाचे मनोरंजन सिंग नीरज मिश्रा अशोक मिश्रा , बिपिन सिंग , राम शरण यादव , सुशील यादव , अभिषेक सिंग तसेच दक्षिण भारतीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश नायर माजी नगरसेवक संतोष शेट्टी अमर पाटील व विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
पनवेल