बालदिनानिमित्त दिशा महिला मंच व धीरज स्नेह उपहार संस्थेमार्फत आदिवासी पाड्यात स्मार्ट टीव्ही भेट..

बालदिनानिमित्त दिशा महिला मंच व धीरज स्नेह उपहार संस्थेमार्फत आदिवासी पाड्यात स्मार्ट टीव्ही भेट...कर्जत मधील पिंपळपाडा या आदिवासी भागातील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत एकूण 25 मुले मुली शिक्षण घेतात.पिंपळपाडा या दुर्गम भागातील शाळेत आजही हव्या त्या मूलभूत सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत.

 विद्यार्थ्यांना ई लर्निंग आणि अध्यापनात गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेला एका स्मार्ट टीव्ही ची आवश्यकता होती.तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये येथील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून दिशा महिला मंच व धीरज स्नेह उपहार यांच्या वतीने बालदिनाचे निमित्त साधून स्मार्ट टीव्ही या शाळेस भेट दिला.या स्मार्ट टीव्ही मुळे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासासोबत मनोरंजनातून विविध प्रकारच्या ज्ञानवर्धक गोष्टीची माहिती टीव्ही च्या माध्यमातून अभ्यासाच्या रूपाने प्रत्यक्ष पाहता येईल त्यातून नवनवीन गोष्टी शिकता येईल.
 त्याचसोबत शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा सामान्य ज्ञान व मनोरंजन स्पर्धा देखील घेण्यात आल्या यावेळी मुलांना शाळेपयोगी विविध बक्षीस,विविध गोष्टींची पुस्तकं, व खाऊ वाटण्यात आला. या बालदिनानिमित्त कार्यक्रमाला दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे, धीरज स्नेह उपहारच्या समाजसेविका इंदू झा दिशा संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते, सदस्य रेखा ठाकूर, कु. तनया आंधळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आशिष वाळवी सर व शिक्षक हणमंत गावडे सर उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने