कळंबोलीत प्रचाराचा झंझावात; प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी) कळंबोली मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचार रॅलीला जनतेचा जोशपूर्ण प्रतिसाद लाभला. रॅलीतील नागरिकांची उपस्थिती ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास कार्यावर असलेला जनतेचा अतूट विश्वास आणि समर्थनाचे प्रतीक ठरली.

           सामाजिक बांधिलकी जपत दिवसरात्र काम करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेल विधानसभा मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने झंझावाती प्रचार दौरा सुरु आहे. त्यानुसार संपुर्ण प्रभाग ७ मध्ये भव्य प्रचार रॅली पार पडली. या प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच तरुणांसह ज्येष्ठ नागरीकांनी या रॅलीत सहभाग घेतला. 
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल विधनसभा मतदार संघातून चौथ्यांदा बहुमताने विजयी करण्यासाठी येत्या २० तारखेला कमळ निशाणी समोरील बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. 

         या रॅलीत शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, पनवेल महापालिकचे माजी नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, दक्षिण भारतीय सेलचे सह संयोजक रमेश नायर, संजय दोडके, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष केशव यादव, महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा निकम, सरचिटणीस दुर्गा सहानी, प्रभाग अध्यक्ष चितरंजन शेट्टी, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, यांच्यासह सेक्टर प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने