कामोठे : (प्रतिनिधी)पनवेल महानगरपालिका चे कामोठे येथील मा. नगरसेवक यांच्या तर्फे कामोठे मधील नागरिकांना दिवाळी निमित्ताने रेशन कार्ड धारकांना फक्त 100 रुपयात मीळणार एक किलो साखर एक किलो रवा एक लिटर पामोलींन तेल आणि एक किलो छान डाळ असे साहित्य मिळेल.
सामान्यांची आणि गोरगरिबांच्या दिवाळी आनंदाने साजरी व्हावी या साठी मा. नगरसेवक गोपीनाथ भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, यांचा आशीर्वाद घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रेरणेने हा समाजभावी उपक्रम राबविण्यात येत आहे व सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे अवहान गोपीनाथ भगत यांच्याकडून करण्यात आले.
Tags
कामोठे