चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार पगारवाढीसोबत २० टक्के बोनस, तीन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, १५२०० सानुग्रह अनुदान व इतर सेवा कामगारांना देण्यात येणार आहेत. या करारावर स्वाक्षरी करताना युनियनचे अध्यक्ष जितेंद्र घरत, जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण,
सचिव विनायक मुंबईकर, संघटक रवींद्र कोरडे, कंपनीतर्फे जनरल मॅनेजर राजेश पालकर, एम गणेसन, भरत सकपाले, साईट हेड अविनाश परांजपे, उपव्यवस्थापक हर्षल पाटील, कामगार प्रतिनिधी राजेंद्र तारेकर, सुरेश म्हात्रे, शिवराम म्हात्रे, प्रकाश एडगे, गणेश पाटील आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल