पनवेल मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी होणार स्वादिष्ठ; २५ हजार सानुग्रह अनुदान मंजूर




पनवेल (प्रतिनिधी): शुक्रवारी दि. ७ रोजी आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी सन 2021-22 सानुग्रहाचा विषय मंजूर करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना तसेच पूर्वाश्रमीच्या समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील समावेशन प्रलंबित असलेले ३२ कर्मचारी यांना २५ हजार सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.



कंत्राटी तत्त्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी, परिश्रमिक कर्मचारी, राष्ट्रीय नागरी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी, आशा वर्कर्स-गट प्रवर्तक तसेच शिक्षण विभागातील शिक्षक यांना ५ हजार  प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे. २४० व त्याहून अधिक दिवस काम केलेल्या एकूण ९०१ पात्र कर्मचार्‍यांना महापालिकेने प्रस्तावित केलेले सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.






हयामुळे, पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी, पूर्वाश्रमीच्या समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील समावेशन प्रलंबित असलेल्या ३२ कर्मचार्‍यांसह  कंत्राटी तत्त्वावर ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची दिवाळी  स्वादिष्ठ  होणार आहे.
थोडे नवीन जरा जुने