इमारतीच्या तोडकामा दरम्यान झालेल्या अपघातात पोकलन चालकाचा मृत्यू





पनवेल, ता.15 - कामोठे वसाहती मधील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या एका इमारतीच्या पडकामा दरम्यान झालेल्या अपघातात एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला आहे.कामोठे वसाहती मधील सेक्टर 35 येथे असलेली ब्लु हेवन ही इमारत राहण्यासाठी धोकादायक ठरवण्यात आली होती. पालिकेने दिलेल्या नोटीसी नंतर या इमारतीच्या पाडकामाची कारवाई विकसका कडून सुरु होती


.या कामा दरम्यान सुमारे 5.45 या वेळेत घडलेल्या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.महत्वाचे म्हणजे पाडकामा सुरु असताना कार्यरत मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरुक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नसल्याचे लक्षात आल्याने नगरसेविका हेमलता गोवारी यांचे पती रवी गोवारी यांनी काहीच दिवसापूर्वी या बाबतची तक्रार कामगार आयुक्त पवार यांच्या कडे केली होती.


 गोवारी यांनी केलेल्या तक्रारी नंतरही कामगार आयुक्तालया कडून या प्रकरणाची दखल घेण्यात न आल्याने आज एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप रवी गोवारी यांनी केला आहे. तक्रारी कडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या करिता प्रयत्न करणार असल्याचे मत गोवारी यांनी व्यक्त केले आहे.


थोडे नवीन जरा जुने