पनवेल दि.१५ (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महश साळुंखे यांनी येवला, नाशिक येथे भेट देऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती म्हणून या भूमीला मुक्तीभूमी म्हणून संबोधिले जाते.
दरवर्षी या भूमीवर अनेक भिमभक्त या ठिकाणी वंदन करतात व सभा आयोजीत करतात. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित सभेला रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष मनोज संसारे व युवा नेते अनिकेत संसारे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंती निमीत्त सर्व भिम भक्तांना महेश साळुंखे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत
Tags
पनवेल