आरोग्य विभागा अंतर्गत सफाई, घंटागाडी, धुरफवारणी कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या बोनस देण्याची आझाद कामगार संघटनेची मागणी

 


पनवेल दि .०९ ( वार्ताहर ) : पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत सफाई, घंटागाडी, धुरफवारणी कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या बोनस देण्याची मागणी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्या कडे निवेदना द्वारे  मागणी केली आहे 


                  या निवेदनात आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी  यांनी म्हटले आहे की , सफाई (१५००) घंटागाडी (४००) धुरफवारणी (१००) जवळ जवळ २००० कंत्राटी कामगार ठेकेदार साई गणेश इंटरप्रायजेस मार्फत काम करत आहेत. 

गेल्या चार वर्षापासुन ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांना बोनस दिला जातो. त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यास कामगारांना अडचणी निर्माण होतात. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीचा पगाराच्या ८.३३% बोनसची रक्कम महापालिकाने ठेकेदार साई गणेश इंटरप्रायजेसला प्रत्येक महीन्याच्या बिलात दिलेली आहे. 

तरी आपण दिवाळीच्या कामगारांना बोनस देण्याच्या लेखी सुचना सदर ठेकेदाराला द्याव्यात ही मागणी त्यांनी केली आहे . 


थोडे नवीन जरा जुने