पनवेल दि .०९ ( वार्ताहर ) : भारतीय सैनिकांबद्दल देशवासीयांच्या मनात नेहमीच आदर असतो. या सैनिकांबद्दल असलेल्या प्रेम व कृतज्ञतेपोटीच दिवाळी भेट म्हणून सीमेवरील सैनिकांसाठी पनवेलमधून २६ हजार ५०० पौष्टिक लाडू पाठवण्यात आले आहेत.
देशातील प्रमुख सणांमध्ये दिवाळी हा एक सण आहे. या सणामध्ये एकमेकांना भेटवस्तू देऊन आपण आनंद वाटून घेत असतो. यासाठी आपले जवान मात्र सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात.
उर्वरित लाडू जम्मू, उधमपूर, अरुणाचल प्रदेश, अखनूर, तवांग, भूज या परिसरात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाडूंच्या बॉक्ससोबत शुभेच्छा पत्रातून जवानांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केली जाते.
ज्योती कानेटकर, पदाधिकारी, भारतीय विकास परिषद, यांचा सहभाग मोलाचा असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय विकास परिषदेचे पदाधिकारी सुभेद भिडे, नितीन कानिटकर, शेखर बर्वे आणि पद्मजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जातो.
दिवाळीपूर्वी फराळ पोहचवण्यासाठी नियोजन हा फराळ दिवाळीपूर्वी जवानांच्या हाती पडेल, यासाठीचे नियोजन केले जाते. फराळ पाठवण्यापूर्वी प्रत्येक पदार्थाची गुणवत्ता, टिकाऊपणा, वापरलेले साहित्य आणि पदार्थ पाठविण्यासाठी लष्कराचे नियम याचे काटेकोरपणे पालन केले जाते.
Tags
पनवेल