पनवेल दि.०७ (वार्ताहर) : दोन लाख रुपयांचा अपघात विमा देण्याच्या बहाण्याने एका महिलेने उलवे येथे राहणाऱ्या व्यक्तीकडून त्याच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून १ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
तक्रारदार भावना देवान (४२) हा उलवे सेक्टर ८ मध्ये राहण्यास असून तो सीवूड्समधील एका शाळेत कार्यरत आहे.
जानेवारीमध्ये त्याने एसबीआय बँकेतून क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यानंतर मार्चमध्ये सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एका महिलेने देवान यांना संपर्क साधला होता. तसेच त्यांच्या क्रेडिट कार्डवर २ लाख रुपयांचा अपघात विमा असल्याचे व त्यासाठी प्रति महिना २ हजार रुपये प्रमाणे चार्ज आकरले जाणार असल्याचे सांगितले.
सदरचा प्लान चालू ठेवायचा की बंद करायचा अशी विचारणा समोरील महिलेने केल्यानंतर देवान यांनी प्लान बंद करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने अपघात विमाचा प्लान बंद करण्याच्या बहाण्याने देवानकडून क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्याच्या कार्डमधून तीन व्यवहाराद्वारे १ लाख ४७ हजार रुपये काढून घेतले.
Tags
पनवेल