चिर्लेतील महिला बचत गटांना दिवाळी फराळ साहित्याची भेट; एकविरा माऊली महिला मंडळाचा उपक्रम

पनवेल(प्रतिनिधी) चिर्ले गावातील एकविरा माऊली महिला मंडळाच्यावतीने गावातील १५ महिला बचत गटातील महिलांना दिवाळी फराळाला लागणाऱ्या साहित्यांची भेट देण्यात आली. हा उपक्रम मंडळाच्या अध्यक्षा वर्षा प्रेमकुमार घरत यांनी त्यांच्या स्वखर्चातून केला असून या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. 


         चिर्ले गावात एकविरा माऊली महिला मंडळाची वर्षा घरत यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आली आहे. दीपावलीनिमित्त या मंडळाच्यावतीने गावातील  महिला मंडळ बचत गट, जय भवानी महिला बचत गट, श्री खंडोबा प्रसन्न गट, दुर्गामाता बचत गट, जय मल्हार बचत गट, नवशक्ती बचत गट, संजीवनी बचत गट, सिद्धिविनायक महिला मंडळ, मंगला गौरी महिला बचत गट, वरद विनायक महिला मंडळ, हिरकणी बचत गट, मंगला गौरी बचत गट, राधाकृष्ण बचत गट, वैभवलक्ष्मी बचत गट, समर्थ कृपा बचत गट या सक्रिय महिला बचत गटातील ३०० महिलांना रवा, मैदा, साखर, डालडा, पोहा, खोबरा व उटणे या साहित्याची भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 


थोडे नवीन जरा जुने