अस्मी सोशल ग्रुपच्या माध्यमातून “रेट्रो वॉल्क फॉर द वर्ल्ड रेकॉर्ड” फॅशन शो





पनवेल दि.१९ (वार्ताहर) : अस्मी सोशल ग्रुपच्या माध्यमातून  रेट्रो वॉल्क फॉर द वर्ल्ड रेकॉर्ड या फॅशन शोच्या आयोजन करण्यात आले आहे. हा फॅशन शो डिसेंबर महिन्यामध्ये कल्याण येथील मेट्रो मॉल येथे होणार असून अस्मि सोशल ग्रुप यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न करणार आहे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या फॅशन शो बद्दलची सर्व माहिती आज कल्याण मेट्रो मॉल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.



 

या पत्रकार परिषदेला अस्मि सोशल ग्रुपच्या संस्थापिका रजनी भट, सहसंस्थापक दिपाली गोडसे-लिमये, सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट बीजल गडा, पनवेल येथील अथर्व मीडिया वर्ल्ड चे मिलिंद राणे, फॅशन कोरिओग्राफर यश शेलार, शशांक पाडळे आणि अस्मि सोशल ग्रुप ची संपूर्ण टीम उपस्थित होती. अस्मि सोशल ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा फॅशन शो 18 ते साठ वर्षे वयोगटासाठी असणार आहे व एक हजाराहून जास्तीत जास्त मॉडेल याच्यामध्ये सहभागी होतील. त्याचप्रमाणे सजग एनजीओ मधील देखील काही महिला याच्यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत.



 त्याचबरोबर एलजीबीटी कम्युनिटीला सुद्धा सहभागी होता येणार असल्याची माहिती अस्मि ग्रुपच्या संस्थापिका रजनी भट आणि दिपाली गोडसे-लिमये यांनी दिली. या फॅशन शोसाठी स्पॉन्सर्ड म्हणून मेट्रो जंक्शन मॉल, एन आय एफ डी पनवेल, अथर्व मीडिया, सिम्प्रा,गव्यान इव्हेंट, बिजल गडा मेक ओव्हर,धर्मचक्र, लंडन प्राईम, रिकोड, मिरॅकल ब्युटी इव्हेंट्स आदींचे सहकार्य मिळणार आहे. सर्व लोकांनी आपल्या स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचे हौस जपण्यासाठी तरी या प्लॅटफॉर्मचा वापर करावा आम्ही अस्मि सोशल ग्रुपच्या माध्यमातून ही संधी सर्व लोकांना उपलब्ध करून देत असल्याचे बिजल गडा यांनी सांगितले.





थोडे नवीन जरा जुने