श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शनच्या प्लॉटचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न




पनवेल दि. १८(वार्ताहर):  करंजाडे मध्ये श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शनच्या सेक्टर ५ , प्लॉट ६५,  येथे  एका प्लॉटचे भूमीपुजन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश शेलार हे आपल्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच चर्चेत असतात, तसेच ते एक चांगले व्यवसायिक सुद्धा आहे.  त्यांचा श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन या नावाने स्वतःचा व्यवसाय आहे. 



               आजवर त्यांनी बरीच कन्स्ट्रक्शन काम योग्य पद्धतीने पूर्ण  केली आहेत. सामाजिक कार्याबरोबर त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये ही एक यशस्वीरित्या उंची गाठलेली आहे. त्यांच्या प्लॉटचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी परेश ठाकूर यांनी  मंगेश शेलार यांना पुढच्या व्यावसायिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी कर्णा शेलार, राजुशेठ, तानाजी शेलार, दिनेश शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते 




थोडे नवीन जरा जुने