द्वारकादास शामकुमार पिशव्यांवर शिवरायांचा एकेरी उल्लेख




*बाबा ग्रुपचे नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांच्या दणक्याने दुकानदार पिशव्या बदलणार*
पनवेल / प्रतिनिधि
शहरातील अनेक रस्ते चौक वस्त्या आदीना महापुरुषांची नावे दिली गेलेली आहेत. समाजासमोर या महापुरुषांचा
आदर्श व त्यांनी केलेल्या त्याग हा समाजापर्यंत पोहोचावा हाच उद्देश यामागे असतो.



महापरूषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये यासाठी अनेक निर्णय ठिकठिकाणी घेण्यात आले आहेत. 
पनवेल शहरातील द्वारकादास शामकुमार साडीच्या दुकानामध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पिशव्यांवर महाराष्ट्राचे आराध्य
दैवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख न करता फक्त "शिवाजी चौक" असा उल्लेख करण्यात आला 



असल्याच्या तक्रारी बाबा ग्रुपचे नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार त्यांनी
द्वारकादास शामकुमार दुकानामध्ये दुकान व्यवस्थापक यांची भेट घेऊन पिशव्यांवर "शिवाजी चौक" उल्लेख असलेल्या पिशव्या ग्राहकाना देण्यात येऊ नये तसेच

 छत्रपती शिवाजी महाराज असा पूर्ण उल्लेख असणाऱ्या पिशव्या यानंतर ग्राहकांना देण्यात याव्यात अशी विनंती केली. त्यानुसार द्वारकादास शामकुमार व्यवस्थापक यांनी आम्ही ९
दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असा पूर्ण उल्लेख असणाऱ्या पिशव्या नव्याने छापून त्या ग्राहकांना देऊ असे आश्वासन दिले.

 ९ दिवसानंतर पिशव्या बदली न झाल्यास द्वारकादास शामकुमार या दुकानामधील शिवरायांचा एकेरी उल्लेख असलेल्या सर्व पिशव्या आम्ही जप्त करू व कायदेशीर कारवाई देखील करू असा इशारा बाबा ग्रुपचे नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी दिला आहे. यावेळी नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांचे द्वारकादास शामकुमार दुकानाच्या व्यवस्थापनाने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने