पनवेल दि.०८ (वार्ताहर) : कळंबोली येथील एका क्लास अकॅडेमीला अचानकपणे लागलेल्या आगीत कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
कंळबोलीतील सेक्टर 3ई येथे व्यास अकॅडमीमध्ये क्लास सुरु असतानाच आज दुपारी अचानकपणे आग आगली. यावेळी क्लास मध्ये 10 ते 12 मुले उपस्थित होते. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही हानी नाही झाली.
दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच सिडको अग्नीशमनदलाचे बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या अकॅडमीत आठवी ते दहावीच्या मुलांचे क्लास घेण्यात येतात.
दरम्यान आज दुपारच्या सुमारास अकॅडमीमध्ये असलेल्या एसीच्या कॉप्रेसरला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही हानी नाही झाली.
दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी सौरभ पाटील आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
Tags
पनवेल