पनवेल दि.०८ (वार्ताहर) : पनवेल रेल्वेस्थानकात दिवा-रोहा पॅसेंजर रेल्वे प्लॅटफॉर्म व्यतिरीक्त मधोमध थांबल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
काही सेकंदच ही गाडी थांबणार असल्याने गाडी पकडण्यासाठी अनेकांना जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्म पाच व सहा येथून रुळ ओलांडून गाडी पकडली. या दरम्यान इतर कोणतीही जलद गाडी न आल्याने मोठी जीवित हानी टळली.
आज सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पनवेल स्थानकात दिवा रोहा पॅसेंजर या रेल्वेच्या मोटारमनने प्लॅटफॉर्म नसलेल्या ठिकाणी जेथे मालगाडी ट्रेन उभ्या करतात तेथे (रेल्वेलाईन क्रमांक तीन) रेल्वे उभी केली.
दिवा-रोहा पॅसेंजरची प्रतीक्षा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच-सहावर उभे होते. नियमित याच प्लॅटफॉर्मवर ही गाडी येत असल्याने शेकडो प्रवाशी त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे होते.
दिवा-रोहा पॅसेंजरची प्रतीक्षा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच-सहावर उभे होते. नियमित याच प्लॅटफॉर्मवर ही गाडी येत असल्याने शेकडो प्रवाशी त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे होते.
अचानक रेल्वे येऊन प्लॅटफॉर्म नसलेल्या ठिकाणी गाडी थांबविल्याने प्रवाशांनी गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मखालील रुळ ओलांडण्यासाठी एकच पळापळ केली. या दरम्यान इतर कोणतीही जलद रेल्वेगाडी न आल्याने मोठा अनर्थ टळला.
Tags
पनवेल