दिवाळीचे निमित्त साधून कामोठे मध्ये आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकस आघाडी मार्फत फराळ करण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले. यात कामोठे मधील विविध समस्यांची चर्चा आणि आमदार म्हणून बाळाराम पाटील यांनी केलेले प्रयत्न याचीही चर्चा झाली.
दिवसेंदिवस कामोठे मधील पाणी प्रश्न बिकट होत आहे. ऐन सणासुदीत नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे तसेच गटारांची साफसफाई होत नसल्याने ती ओसंडून वाहत आहेत.
पाणी टंचाई जर अशीच सुरू राहिली तर महाविकास आघडी तर्फे भव्य मोर्चा काढण्यात यावा असे आग्रही भूमिका सर्वच पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यास आमदार बाळाराम पाटील यांनी देखील तयारी दर्शवली त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक होण्याची शकता आहे. मालमत्ता कराला महाविकास आघाडीचा तीव्र विरोध असून विरोधी पक्ष म्हणून शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने सभागृहात ठोस भूमिका मांडली म्हणून नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले होते याची उजळणी देखील करण्यात आली. तसेच भविष्यात देखील यावर मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्या बरोबर मीटिंग घेऊन नागरिकांना यातून दिलासा देण्याचा आपला प्रयत्न असेल असे आश्वासन आमदार बाळाराम पाटील यांनी दिले तसेच वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरु. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्या ऐवजी पनवेल पालिकेतील सत्ताधारी महापौरांचा बंगला, आयुक्तांचा बंगला बांधण्यात करोडो रुपये खर्च करत आहे. आणि नागरिक मात्र चतका सारखी टँकरची वाट पाहत आहे हे चित्र पनवेल साठी भूषण नाही.
शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष यांनी देखील पाणी प्रश्न आणि ओसंडून वाहणाऱ्या गटारांच्या पाण्या संबंधात ठोस भूमिका मांडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सूरदास गोवारी यांनी महाविकास आघाडी असेच अभेद राहून येणाऱ्या निवडणुका देखील एकत्र लढवू असे सांगितले. तर शिवसेनेच्या वतीने गणेश खांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम मा. नगरसेवक प्रमोद भगत यांच्या संकल्पनेतून माजी आमदार दत्तुशेठ पाटील शाळा, सेक्टर ९, कामोठे येथे करण्यात आला होता. यावेळीआमदार बाळाराम पाटील, मा. नगरसेवक प्रमोद भगत, मा. नगरसेवक सखाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुरदासशेठ गोवारी, शेकाप कामोठे, शिवसेना पनवेल उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी, शेकाप शहर अध्यक्ष अमोल शितोळे, शिवसेना शहर प्रमुख राकेश गोवारी, शेकाप प्रवक्ता मधुकर सुरते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रघुनाथ पाटील, चिटणीस पंडित गोवारी, अल्पेश माने,आदिनाथ सावंत, प्रभाकर गोवारी , संतोष चिखलकर, गणेश खांडगे , संतोष घोळे , सचिन त्रिमुखे , प्रशांत आनंदे , नाना भगत, रमेश गोरे , प्रमोद म्हात्रे ,संतोष म्हात्रे, शेकाप महिला अध्यक्षा उषा झणझणे, महिला
कार्याध्यक्षा शुभांगी खरात, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा संगिता पवार , शिवसेना महिला कामोठे संघटक संगिता राऊत, माया आहिरे , जयश्री राठोड, गिता उंडे ,शुभांगी कड , तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकाऱी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
पनवेल