पनवेल मध्ये गेली अनेक वर्षे डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने पनवेल च्या जनतेसाठी अनोखी दिवाळी भेट.
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने शनिवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल मधील इतर चार रोटरी क्लब यांच्या वतीने ग्लोबल ग्रँट च्या सहकार्याने पनवेल मधील पनवेल महानगरपालिकेचे नागरी प्राथमिक केंद्र क्रमांक 1 गावदेवी पाडा साठी एक सोनोग्राफी मशीन आणि एक ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर मशीन रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ गिरीश गुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले .
यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष रो लक्ष्मण पाटील , सचिव रो.अनिल ठकेकर, डॉ. आमोद दिवेकर , मनोज आंग्रे , विवेक वेलणकर ,अनिल खांडेकर, ऋषीकेश जोशी उपस्थित होते .तसेच केंद्राच्या प्रमुख डॉ ,रेहाना मुजावर आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता .
या मशीन मुळे पनवेल परिसरातील गरीब जनतेला याचा खूप फायदा होणार आहे .
Tags
पनवेल