पनवेल दि.२५ (संजय कदम) : दाऊदी बोहरा जमात पनवेल रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन रोटरॅक्ट क्लब आणि इनरव्हील क्लबच्या पनवेल डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालय (पनवेल उप जिल्हा) रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमिल मुर्तजा, साहेब हसनी, पनवेल महानगरपालिकेचे मा.नगरसेवक राजू सोनी, शं.अलियासगर, सैफुद्दीन, कल्पेश परमार, हितेश राजपूत, रोटरी सदस्य कल्पना नांदगावकर, इनरव्हील सदस्य मुस्तफा वोहरा, आणि हॉस्पिटलचे डॉ.सकपाळ व त्यांचे सहकारी तसेच बोहरा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी ५४ फळांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
Tags
पनवेल