पनवेल दि.१७ (वार्ताहर) : इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313 च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांनी नुकतीच इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन ला भेट दिली. त्यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांची बैठक घेतली.
सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना क्लबच्या कामकाजाच्या नोंदींबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केल्याचे पाहून आनंद व्यक्त करून खूप कौतुक केले.नंतर सर्वसाधारण सभेची सुरुवात झाली.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. क्लब सदस्य डॉक्टर राजश्री बागडे यांनी अतिशय उत्कृष्ट गणेशवंदना सादर करून सगळ्यांचीच मने जिंकली. यावेळी इनरव्हील डिस्ट्रिक्ट इ एस ओ डॉक्टर शोभना पालेकर या आवर्जून उपस्थित राहिल्या. रोटरी क्लबच्या कर्णबधिर निवासी शाळेतील मुलांना शाळेचे गणवेश देण्याचा उपक्रम डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या हस्ते करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात आणि इतर कलागुणांमध्ये चांगले काम करून नाव कमावणार्या सदस्यांचा यावेळी सन्मान करण्यात करण्यात आला. सदस्यांना प्रोत्साहन देण्याची ही कल्पना सगळ्यांनाच खूप आवडली. क्लब अध्यक्षा कल्पना नागावकर यांनी आगामी उपक्रमांबद्दल माहिती दिली आणि सर्व सदस्यांचे अतिशय बहुमोल सहकार्य मिळत असल्याचे सांगुन आभार व्यक्त केले.
सेक्रेटरी सई पालवणकर हिने सर्व झालेल्या प्रोजेक्टची माहिती नेमक्या शब्दांत उत्कृष्टपणे दिली.क्लब एडिटर शितल गायकवाड संपादित प्रतिबिंब या बुलेटिन चे प्रकाशन डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या हस्ते झाले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी क्लबचे संपूर्ण कामकाज आणि बुलेटीन अतिशय आवडल्याचे सांगितले. सर्वांनाच उत्कृष्टपणे मोलाचे मार्गदर्शन केले. क्लबच्या माजी प्रेसिडेंट डॉक्टर जयश्री पाटील यांनी डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या आदरतिथ्यामध्ये विशेष सहकार्य केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन ही डिस्ट्रिक्ट चेअरमन व्हिजिट खूप छान झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
Tags
पनवेल