पनवेल दि. १७ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन फलाट नं.4 वर आलेल्या लोकल गाडीचे लगेज डब्यात अनोळखी मृतदेह सापडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पनवेल रेल्वे स्टेशन फलाट नं.4 वर आलेल्या लोकल गाडीचे मधल्या लगेज डब्यात अनोळखी मृतदेह सापडून आला आहे. सदर मृतदेह हिंदू पुरुषाचे असून वय अंदाजे 30 वर्षे, उंची 5 फूट 2 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने काळा-सावळा, चेहरा उभट, नाक- सरळ, केस काळे-पांढरे मध्यम, दाढी काळी बारीक, दात शाबुत तसेच अंगात फिक्कट आकाशी रंगाचा फुल शर्ट, निल्या रंगाची हाफ पैन्ट घातलेली आहे.
सदर मयत इसमाचे अद्याप कोणीही वारस मिळून आलेले नाही. सदर इसमाबाबत काही माहिती उपलब्ध असल्यास पनवेल रेल्वे पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक डी.एस.बदाले मोबाईल क्र.९५९४९१२२९४ यांच्याशी संपर्क साधावा.
Tags
पनवेल