मजुरीची उर्वरित रक्कम वेळेवर न दिल्याने चौकडीने केली एकास जबरी मारहाण



 पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : मजुरीची उर्वरित रक्कम वेळेवर न दिल्याने चौकडीने एकास जबरी मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल फोन जबरीने घेतल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .  



                       ठेकेदार शिवाजी राठोड याने मजुरीची उर्वरित रक्कम वेळेवर न दिल्याने चार जणांनी एकत्र येऊन त्यांना लोखंडी रॉड ने मारहाण करून त्याचे तोंड दाबून त्याचे हातपाय रस्सीने बांधण्याच्या प्रयत्न करून त्याच्या कडील राहिलेल्या कामाचे पैसे , एटीएम कार्ड ,आधार कार्ड ,पॅनकार्ड , मोबाईल फोन अश्या जवळपास १७ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरीने काढून घेतल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



थोडे नवीन जरा जुने