पनवेल / प्रतिनिधि
काही दिवसांपूर्वी पनवेल शहरातील द्वारकादास शामकुमार साडीच्या दुकानामध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पिशव्यांवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख न करता फक्त “शिवाजी चौक” असा उल्लेख करण्यात आला असल्याच्या तक्रारी बाबा ग्रुपचे नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा यांना प्राप्त झाल्या होत्या
त्यानुसार त्यांनी त्यावेळी द्वारकादास शामकुमार दुकानामध्ये दुकान व्यवस्थापक यांची भेट घेऊन पिशव्यांवर “शिवाजी चौक” उल्लेख असलेल्या पिशव्या ग्राहकाना देण्यात येऊ नये तसेच छत्रपती शिवाजी महाराज असा पूर्ण उल्लेख असणाऱ्या पिशव्या यानंतर ग्राहकांना देण्यात याव्यात अशी विनंती केली होती
त्यानुसार द्वारकादास शामकुमार व्यवस्थापक यांनी छत्रपती शिवाजी महाराज असा पूर्ण उल्लेख असणाऱ्या १५ हजार पिशव्या नव्याने छापून यानंतर अशी चुकी पुन्हा होणार नाही व ग्राहकांना यानंतर याच पिशव्या आम्ही देऊ असे आश्वासन दिले.

Tags
पनवेल