शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२२रोजी रात्रौ ८ वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा समारंभ होणार असून या कार्यक्रमासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन (३१३) मुक्ती पानसे उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात २५ हून अधिक नवउद्योजिकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे तसेच विशेष लक्षवेधी सत्कार केले जाणार आहेत
.यानिमित्ताने मराठी व हिंदी गाण्यांची मैफली आयोजित केली आहे. या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षा साधना धारगळकर,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी व रंगनील नाट्य संस्थेच्या अध्यक्षा कल्पना कोठारी यांनी केले आहे.