इसम बेपत्ता






पनवेल दि.१३ (संजय कदम) : तु घरी निघुन जा मी नंतर येतो असे सांगून गेलेला पती परत न आल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 



स्नेहील केशवराव वासनिक (वय ३८ वर्षे, रा. करंजाडे) असे या इसमाचे नाव असून त्याची उंची ५ फुट ५ ईच, रंग सावळा, केस काळे, डोळे- काळे, नाक सरळ, चेहरा उभट, बांधा मध्यम, अंगात नेसुस ऑफ व्हाइट रंगाचा शर्ट निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे.


 त्याच्या कपाळाला डाव्या बाजुला जखमेचा व्रण असून त्याला मराठी हिंदी भाषा बोलता येते. सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.०२२ -२७४५२३३३ किंवा पोहवा सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधा.




थोडे नवीन जरा जुने