आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आष्टे लॉजिस्टीकमधील गुडविल कंटेनर सर्व्हिसेस मधील कामगारांचा पगारवाढ व इतर सोयीसुविधांचा करार रायगड जिल्हा कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या दालनात पार पडला
तीन वर्षांच्या झालेल्या करारानुसार कामगारांना १० हजार रुपयांची पगार वाढ करण्यात आली त्यामध्ये पहिल्या वर्षी प्रती महिना चार हजार रुपये त्यानंतर नंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी ०३ हजार रुपयांची पगारवाढीचा समावेश आहे. . तसेच ०२ लाख रुपयांपर्यंत मेडीक्लेम पॉलिसी, सुट्ट्या, बोनस अशा अनेक सोयी सुविधांचा समावेश आहे. सदर करारावर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, सचिव विनायक मुंबईकर, कार्यालयीन सचिव समिरा च
सहा महिन्यापासून प्रलंबित असणारा या कराराबाबत मध्यस्थी करण्यासंदर्भात संघटनेने सहाय्यक कामगार उपायुक्त शितल कुलकर्णी यांच्याकडे रीतसर पत्र देवून विनंती केली. त्यामध्ये शितल कुलकर्णी यांनी मोलाची भूमिका घेवून संघटना व व्यवस्थापनाला मोलाचे मार्गदर्शन करून सदर करार हा पूर्ण केला. याप्रसंगी कामगार प्रतिनिधी योगेश गायकर, मदन पाटील, सचिन कुलकर्णी, प्रशांत पाटील, अतुल नाईक आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल