पनवेल दि.१३ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील सुकापुर येथील ओम शिवा कॉम्प्लेक्समध्ये दोन घरफोड्या झाल्याने रहिवाशी भयभीत झाले आहे.
ओम शिवा कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या सुनिता सदाशिव पाटणकर (रूम नंबर 101) व पंडित डेरे (रूम नंबर 202 ए विंग) या दोन्ही घरांमध्ये कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे.
या घटनेची माहिती खान्देश्वर पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेची पथके यांनी घटना स्थळी दाखल झाल होते. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात घरफोडीचे सत्र वाढत असल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Tags
पनवेल