पनवेलमधून प्रकाशित होणाऱ्या विविध दिवाळी अंकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन



पनवेल दि.२४ (वार्ताहर) : दिवाळी अंक आणि दिवाळी हे एक अतुट नाते असून दिवाळी सणानिमीत्त दिपावली विशेषांक प्रकाशित करणे ही परंपरा आहे. त्यानिमीत्त अविनाश कोळी यांचा हक्काच व्यासपीठ, अनिल भोळे यांनी रसायनी टाइम्स आणि संजय कदम यांनी साप्ताहीक रायगड मनोगत हे दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. या दिवाळी अंकांचे तसेच श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट आणि श्री माहेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनेश गिल्ड यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी त्यांनी साहित्य रसिकांना दिवाळी अंकांची भेट या माध्यमातून मिळेल असे सांगत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 



हक्काच व्यासपीठचे हे आठवे, रसायनी टाइम्सचे सव्वीसावे, आणि साप्ताहीक रायगड मनोगतचे हे अठरावे वर्ष आहे. या दिवाळी अंकांच्या प्रकाशनावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, भाजपचे पनवेल शहर खजिनदार संजय जैन, श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकरभाऊ घरत, उद्योजक धनराज विसपुते, साप्ताहीक रायगड मनोगतचे कार्यकारी संपादक संजय कदम, पत्रकार प्रशांत शेडगे, मयुर तांबडे, रविंद्र गायकवाड, अनिल कुरघोडे, अनिल भोळे, दिनेश गिल्डा, युवानेते केदार भगत, मेघना कदम यांच्यासह पत्रकार, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने