. जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवार दिनांक २४/१०/२०२२ रोजी बालग्राम आश्रमातील अनाथ मुलाबरोबर संपूर्ण दिवसाचे जेवण व त्यांना कपडे वाटप करण्यात आले . वंचित अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करून एक अनोखा उपक्रम या प्रतिष्ठान तर्फे राविण्यात आला
. आपल्या घरातील घास या अनाथ मुलांना द्यावा अशी संकल्पना प्रतिष्ठानचे मार्गदर्शक बबन बारगजे यांनी मांडली व त्यासाठी संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे, सचिव हनुमंत विघ्ने यांनी सहमती दर्शविली. आज खांदा कॉलनी येथील बालकाश्रमाध्ये सर्व अनाथ मुलांना दिवसभराचे जेवण व कपडे वाटप करण्यात आले सहसचिव ऋषिकेश सांगळे, रायगड जिल्हाध्यक्ष, रामदास सांगळे, श्री वारे साहेब , हरिदास वनवे विनायक मुंडे संजय पासलकर महेश बारगजे व इतर सर्व सहकाऱी उपस्थित होते . सर्व सदस्यांनी आपल्या खर्चातील थोडासा वाटा या अनाथ मुलांसाठी देण्याचे ठरवले त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने यावर्षीची दिवाळी जनसेवा आश्रम खांदा कॉलनी येथे ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे नेरे येथील जनाधना आश्रमास चेक देण्यात आला. सर्व मदत करते त्यांचे यावेळी बबन बारगजे यांनी आभार मानले.
Tags
पनवेल