एकता सामाजिक संस्थेची आदिवासी पाड्यावर बांधिलकीची दिवाळी !


दिवाळीचा आनंद प्रत्येकजण आपल्यापरीने साजरा करीत असतो. प्रकाशाच्या या उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे कोंदण देण्याचा प्रयत्न काहीजण करीत असतात. कामोठे मधील एकता सामाजिक संस्था गेली १० वर्ष कर्नाळा किल्ला तसेच पेण परिसरात आदिवासी बांधवाची देखील दिवाळी आनंदात साजरी व्हावी प्रयत्न करत आहे.  दिवाळी हा सण समाजातील सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु अशा या आनंदाचा सोहळ्यात आदिवासी जनता मात्र आपले पोट भरण्यातच लागलेली असते. आज देशात एकीकडे विकासाच्या शिखरावर पोहचलेली जनता दिसत असताना दुसरीकडे या सर्व गोष्टींपासून कोसो दूर असलेली पेण तालुक्यातील खैरासवाडी येथील आदिवासी बांधव आहेत. इतरांप्रमाणेच त्यांचेदेखील आयुष्य दिवाळ सणाच्या प्रकाशाने उजळून निघावे, दैनंदिन कणखर असे आयुष्य विसरून चार क्षण आनंद-उत्साहाचे घालविता यावे, निरागस मुलांना दिवाळीचा फराळ मिळावा यासाठी एकता सामाजिक संस्थेने  



पेण तालुक्यातील खैरासवाडी या आदिवासी पाड्यावरील ५४ कुटुंबाना रवा, साखर, मैदा प्रत्येकी एक किलो तसेच गोडेतेल एक लिटर, सुंगधी उटणे, लहान मुलांना मिठाईचा बॉक्स देण्यात आला.  याप्रसंगी मुलभूत गरजांसाठी सतत धडपडणाऱ्या आदिवासींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. कार्यक्रमादरम्यान दिवाळी सणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.



पनवेल येथील अंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अवघे काही किलोमीटर अंतर असताना देखील येथील आदिवासी बांधव वंचित राहिला आहे त्यामुळे या परिसरात कुणीही मोठ्या प्रमाणावर सणवार साजरे करत नसल्याचे चित्र दिसून येते. आदिवासी गरजूना आनंद घेता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते तसेच जेष्ठ समाजसेवक संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली एकता सामाजिक संस्थेने उपक्रम राबवला, यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, ओंकार विचारे, अभिषेक लुडबे, प्रशांत कुंभार, सुनील करपे, श्रद्धा लुडबे, शितल शितोळे, साईराज शितोळे उपस्थित होते तर सदर कार्यक्रम राबवण्यासाठी प्रसाद शेट्ये, गौरी दळवी, राजन शेळके, संगीता पवार, संतोष चिखलकर, बापू साळुंखे, उमेश नाईक, अर्चना इप्ते, मंगेश अढाव, गणेश चौकेकर, सचिन शिंबडे, गणेश शिंदे, अजित चौकेकर, हरीश बाबरीया, महेश चव्हाण यांनी सहकार्य केले.



थोडे नवीन जरा जुने