शेतकरी कामगार पक्षाला करंजाडे मध्ये मोठा धक्का बसला आहे. शेकापचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशा म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, करंजाडे मधील पाण्याच्या पाइप लाईनचे जे काम २०२३ साली पुर्ण होण अपेक्षित होत ते काम घडकोंबड्या सरकारमुळे रखडले, मात्र आत्ता हे काम वेळेत करून करंजाडे मधील नागरीकांची पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन केले. करंजाडे मध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी शेकापचे माजी सरपंच बळीराम नारायण म्हात्रे, माजी उपसरपंच आशा बळीराम म्हात्रे, सुनिलशेठ भोईर, प्रभुद सामाजिक संस्थेचे विक्रम मोरे, अविनाश कदम, गणेश गायकर, विशाल म्हात्रे, छोटुराम पारधी, उपाबाई पारधी, गायत्री पारधी, रविंद्र पारधी, नितीन पारधी, अभिजीत थोरात, किशोर यादव,
अमोल माने, सुजित जाधव, सदानंद सराफ, रुपेश पेडांमकर, राजीव पवार, संदीप मोरे, यशवंत खेडकर, विजय गुरव, गणेश बालझडे, भिमराव चव्हाण, अशोक जाधव, ओमकार सकाटे, प्रथमेश पवार, ओमकार चंदने, प्रसाद खोपडे, हर्षद सहानी, ओमकार साळवी, मंगेश माळी, आकाश पवार, संकेत घाटे, राजेश इलीगेटी, वेदांत शिंदे, अश्वीनी शिरसागर, प्रवीण सावंत, रुपेश पेडांमकर, सक्षम मोरे, स्वप्नील मोरे, राकेश धुमाळ हे भाजपवासी झाले आहेत. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत,
विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, नाथाभाई भारवाड, सागर आंग्रे, मंगेश शेलार, विजय आंग्रे, गणेश मोरे, नंदू भोईर यांच्यासह श्री सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बळीराम नारायण म्हात्रे यांची भाजपचे तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले
Tags
पनवेल