पनवेल परिसरात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात २ जखमी



पनवेल दि.२४ (वार्ताहर) : पनवेल परिसरात झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात २ जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

मोहनसिंग बाबूसिंग राजपूत (वय २९) हा त्याच्या ताब्यातील हिरो मोटारसायकल घेऊन पनवेल जवळील करंजाडे आर ४ ते कॉलेजफ़ाटा जाणाऱ्या रस्त्यावर जात असताना त्याला केटीएम मोटारसायकलीवरील चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाला आहे


. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत पनवेल तालुक्यातील आपटे फाटा खारपाडा टोलनाक्याजवळ ह्युंदाई क्रेटा गाडीवरील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने व हरगर्जीपणाने चालवून मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेश भोपी (वय ४४) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



थोडे नवीन जरा जुने