पनवेल दि.२४ (संजय कदम) : आर्थिक वादातून एका वेल्डर व्यवसाय करणाऱ्याची हत्या केल्याची घटना पनवेल जवळील सुकापूर गावाच्या हद्दीत रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
या ठिकाणी वेल्डिंग व्यवसाय करणारे रियाजुद्दीन शेख (वय ५८ वर्षे) यांची आर्थिक वादातून अज्ञात इसमाने अज्ञात हत्याराने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऐन सणासुदी च्या दिवसात हि हत्या झाल्याने या अज्ञात व्यक्तींना शोधण्याचे काम खान्देश्वर पोलिसांना करावे लागणार आहे. या घटनेची माहिती मिळताच खान्देश्वर पोलिसांचे पथक घटना स्थळी पोहचून त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शोधमोहिम सुरु केले आहे.
Tags
पनवेल