पनवेल दि.२२ (वार्ताहर) : कामोठे विभागातील वजनदार व्यक्तिमत्व सुनील शेठ गोवारी यांनी शेकडो समर्थकांच्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवारी यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी महानगर प्रमुख प्रथमेश सोमण व तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे उपस्थित होते. कामोठा विभागातील अधिकाधिक स्थानिकांचे समर्थन गोवारी यांच्यामुळे मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सुनील गोवारी यांची कामोठा शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली
Tags
पनवेल