लोकोपयोगी प्रथांचे पालन करत विविध समाजोपयोगी उपक्रम टाटा स्टीलने सर्वसमावेशक वृद्धीला दिले प्रोत्साहन




पनवेल(प्रतिनिधी) आपल्या व्यवसाय धोरणांमध्ये समाजाचे हित जपले जावे यासाठी आग्रही असलेल्या टाटा स्टीलने व्यवस्थापनामध्ये लोकांना सहभागी करवून घेण्याचे धोरण राबवले आहे. समुदाय विकासाप्रती वचनबद्ध राहण्याची संस्कृती या कंपनीने कायम जपली असूनलोकांसाठी टाटा स्टीलने लोकोपयोगी प्रथांचे पालन करत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. त्यामुळे समन्वय व नाती जोडली जाण्याचे वातावरण निर्माण करणे टाटा स्टीलला शक्य झाले आहे. 



      सावरोली गावस्थित आधीची भूषण स्टील लिमिटेड ही कंपनी टाटा स्टीलने मे २०१८ मध्ये अधिग्रहित केली.  त्यावेळी त्यांनी व्यवस्थापन व कामगारवर्गातील एकाही कर्मचाऱ्याला बदलले नाही. टाटा स्टीलत्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर कंपन्या आणि व्हेंडर सहयोगी यांच्याकडील जवळपास ७२% नवे कर्मचारी हे महाराष्ट्रातील आणि खासकरून खालापूरकर्जत व रायगड जिल्ह्यातील गावांमधील आहेत. कंपनीने खरेदी व कंत्राट व्यवस्थापन यंत्रणेमध्ये देखील पुरेपूर पारदर्शकता ठेवली असून कोट्यवधी रुपयांची अनेक कंत्राटे सावरोलीतील स्थानिक व्यावसायिकांना देण्यात आली असल्याचे टाटा स्टील व्यवस्थापनाने अधोरेखित केले आहे. 




       या भागात सर्वसमावेशक वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा स्टीलने सावरोलीदेवनहावे आणि खालापूर भागात हाती घेतलेला एक प्रमुख प्रकल्प डब्ल्यूईई (महिला सक्षमीकरण आणि उद्यमशीलता) हा आहेस्वयंसहायता गट तयार करून तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी व आई-बाळाच्या आरोग्यासाठी अधिक चांगल्या आरोग्य सेवासुविधा पुरवून सूक्ष्म उद्योग उभारून महिलांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीमध्ये विकास घडवून आणणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आजवर ६०० पेक्षा जास्त महिला आणि पाच वर्षांखालील मुलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे. सावरोली-निफाण त्रिबलवाडी मध्ये पाणी साठवण्यासाठी ओव्हरहेड टाकी बांधून आणि देवनहावे पंचायतीमध्ये स्थानिक पाणीसाठ्यांचे पुनरुज्जीवन करून टाटा स्टीलने पाणी साठवण्याची क्षमता ६७ लाख लिटर इतकी वाढवली आहे१००० पेक्षा जास्त कुटुंबांना याचा लाभ मिळत असून स्थानिक आदिवासींना चांगले मासे उपलब्ध होऊ लागले आहेत.



     लाईव्ह-लर्निंग थ्रू व्हायब्रंट एज्युकेशन हा आणखी एक प्रकल्प असूनडिजिटल वर्ग आणि अभ्यासाच्या नवनवीन पद्धती यांच्यामार्फत स्थानिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवणे हा याचा उद्देश आहे. ८ सरकारी शाळांमध्ये ३० वर्गांमध्ये ई-लर्निंगच्या पायाभूत सोयीसुविधा इन्स्टॉल करण्यात आल्याने २०२२ वर्षात ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण टक्केवारीत लक्षणीय वाढ करून दाखवली आहे. काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम आणि आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नूतनीकरण करण्यात आल्याने सावरोलीमधील धामणी आदिवासी वाडीतीळ २००० पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळाले आहेत. महामारी सुरु झाल्यापासून लोकांना सुके रेशन पुरवणेपीपीई किट्सवैद्यकीय उपकरणेव्हेन्टिलेटर्स आणि बायपॅप मशीन इत्यादी सामग्री रायगड जिल्हा प्रशासनामार्फत पुरवून टाटा स्टीलने कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये स्थानिकांची मदत केली आहे. 



थोडे नवीन जरा जुने