पनवेल दि.१९ (वार्ताहर): भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय पवार आणि भाजपा वसई विरार जिला मंत्री बिजेंद्र कुमार, उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश सह संयोजक अमन वैश्य यांचा उपस्थित वंचित बहुजन आघाडी विरार शहर अध्यक्ष व ब्लू टाइगर ट्रस्ट चे ट्रस्टी सिद्धार्थ कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे कार्यकर्ता व समाजसेवक किरण मोरे, शिवसेना कार्यकर्ता व ब्लू टाइगर ट्रस्ट चे अध्यक्ष विशाल चौहान यानी भारतीय जनता पार्टी मधे जाहीर पक्ष प्रवेश केला
त्यांची भाजप कामगार मोर्च्या प्रणित छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेने मध्ये पदनियुक्ती करण्यात आली. यामध्ये छत्रपति शिवाजी महाराज कामगार सेना, कोंकण विभाग सचिवपदी किरन मोरे, महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी विशाल विनायक चौहान, कार्यकारणी सदस्यपदी ऍडव्होकेट मिनी उपाध्याय, वसई विरार जिला महामंत्रीपदी सिद्धार्थ कदम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तबद्दल सर्व राजकीय स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
Tags
पनवेल